Types of Computer (marathi)

 Types of Computer


संगणकाचे चार प्रकार असतात.

1. Super Computer

2. Mainframe Computer

3. Mini computer (midrange)

4. Microcomputer


1. Super Computer - 

              हा computer सर्वात शक्तिशाली असतो. हा संगणक अतिशय वेगाने data वर प्रक्रिया करण्याचे कार्य करत असतो. या computer मध्ये 100 पेक्षा जास्त CPU एकत्रीत कार्य करत असतो. भारताने पहिला Super Computer 1991 या सालि तयार केला ज्याचे नाव परम असे देण्यात आले. ज्याची निर्मिती विजय भाटकर यांनी केली.

              या संगणकाचा सर्वाधिक वापर नासा मध्ये केला जात असतो. IBM कंपनी ने जगातील सर्वात वेगवान computer तयार केला ज्याचे नाव Blue Gene . Super Computer हा picosecond या वेळेमध्ये माहितीवर प्रक्रिया करत असतो. या संगणकाचा वापर मोठ्या संस्था किंवा सरकार करत असते.

या संगणकाची किंमत 40 कोटी पेक्षा जास्त असते.



2.   Mainframe computer - 

                  हा सुपर कम्प्युटर पेक्षा कमी शक्तिशाली असतो. हा कम्प्युटर एका रूम मध्ये एयर कंडीशन किंवा वातानुकूलित ठिकाणी ठेवलेला असतो. हा कम्प्युटर आपण दिलेल्या माहितीवर वेगाने साठवून ठेवत असतो आणि खूप वेगाने प्रक्रिया करतो. या कम्प्युटरचा वापर एलआयसी, आरक्षण, रिझर्व बँक मध्ये केला जातो.


3.  Minicomputer - 

                  हा संगणकाचा तिसरा प्रकार आहे. या संगणकाला मिड रेंज असे देखील म्हणतात. हा मेनफ्रेम कंप्यूटर पेक्षा कमी शक्तिशाली असतो. मिनी कम्प्युटरचा वापर संगणकीय जाळ्यांमध्ये केला जात असतो. मिनी कम्प्युटर हा सर्वर म्हणून काम करत असतो. कंपनीच्या उत्पादन विभागांमध्ये अनेक मशिनरी वरती नियंत्रण सोने का ठेवण्यासाठी मिनी कम्प्युटर चा वापर केला जातो. या संगणक ची किंमत 50 हजारांपासून एक लाख पर्यंत असते.


4. Micro computer - 

                     हा तीन प्रकारच्या कम्प्युटर पेक्षा कमी शक्तिशाली असतो. या संगणकाचा वापर सर्वाधिक केला जात असतो. हा संगणक सर्वात लोकप्रिय असतो.  Micro computer  ला PC किंवा digital Computer असे सुद्धा म्हणतात. संगणकाचा वापर एका वेळेस एक व्यक्ती करत असतो . Microcomputer हा दोन विभागांमध्ये विभागला जातो.

 Desktop micro computer.

Portable microcomputer.

1. Desktop computer -

                हे कम्प्युटर टेबल वरती ठेवले जात असते. हे कम्प्युटर वजनाने जड असतात आणि आकाराने मोठे असतात. हे कम्प्युटर सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नसतात.

2. Portable computer - 

                 हे कम्प्युटर आकाराने छोटे आणि वजनाने हलके असतात. हे कम्प्युटर सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतात. 


Comments

Popular posts from this blog

DS - Representation of linked list in memory.

Cpp- Program for call by reference

NUMERICAL ABILITY